For Doctors Emergency Care Medikoe LogoDr Specialisation
Book AppointmentHealth HubMedicommunity
Home > Health Hub > Article > World Autism Awareness Day

World Autism Awareness Day

Dr Avinash Bhosale

Dr Avinash Bhosale

  , Bengaluru     Apr 1, 2022

   1 min     

undefined

ऑटिझम म्हणजे काय ? 

ऑटिझम (स्वमग्नता) हि जन्मभर राहणारी वैकासिक समस्या आहे.  विकासाच्या दोन मुख्यक्षेत्रातील वागणुकीवरून ऑटिझम लक्षात येतो.

एक म्हणजे समजून घेणे आणि संवाद साधणे ह्याच्या क्षमतेतील अडचणी

दुसरं संकुचित आवडीनिवडी, वर्तनातली पुनरावृत्ती व स्वमग्नता

ऑटिझमच एकच असं लक्षण सांगता येणार नाही तसेच ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये लक्षणे  एक सारखीच असतील असे नाही . वर्तवणुकीतील हि लक्षणे  अगदी लहानपणापासूनच ह्या मुलांत सातत्याने असतात ( पण बऱ्याचदा त्या कडे उशीरा लक्ष जाते). आणि त्यामुळे त्यांना रोजच्या जगण्यात अडथळे जाणवतात.  

 ऑटिझम का होतो? 

ऑटिझम हा न्युरो डेव्हलेपमेंटल डिसऑर्डर आहे. त्याची निश्चित कारण अजूनतरी आपल्याला ठाऊक नाहीत. गर्भावस्थेपासून ह्या मुलांच्या मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारची असल्याने मेंदूची वेगळी कार्यप्रणाली दिसून येते.  

सर्वसाधारण मुलं जेव्हा इतर लोक जे बोलतात, वागतात त्याला समजून घेऊन त्याला प्रतिसादात्मक कृती करतात त्यासाठी आवाज शब्द आणि हालचालीचा वापर करतात. पण ऑटीझम झालेल्या मुलांमध्ये या जाणिवा तितक्याशा विकसित झालेल्या नसतात म्हणूनच त्यांच्या वागण्यामध्ये वेगळेपणा जाणवतो. एकूणच संवाद सुरु कसा करावा आणि तो पुढे कसा न्यावा हे ऑटीझम झालेल्या मुलांना कळत नाही. या समस्यांमुळे ऑटिझम झालेली मुलं इतर मुलांमध्ये मिळून-मिसळून खेळण्यासाठी उत्सुक नसतात.  

प्रमाण

अमेरिकेत दर ४४ मुलांमागे १ तर भारतात दर १०० मुलांमागे किमान १ मुल ऑटीझमग्रस्त आहे. 

ऑटीझमचे प्रमाण मुलग्यांमध्ये मुलींपेक्षा चार पटीने अधिक आहे. 

सर्व प्रदेशातील तसेच सर्व आर्थिक-सामाजिक स्थरातील मुलांमध्ये ऑटीझम आढळतो. 

निदान

तस पाहायला गेलं तर ऑटिझमचे निदान वयाच्या दुसऱ्या वर्षीच केले जाऊ शकते तरीही बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर होते.

MCHAT R/F स्क्रीनिंगने मुलाला ऑटिझमची रिस्क आहे का ते लवकर कळते. १६ ते ३० महिने वयोगटाच्या प्रत्येक मुलाची MCHAT R/F स्क्रीनिंग टेस्ट करणे आवश्यक असल्याचे अमेरिकन तसेच भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे मत आहे. 

आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं कि, ऑटीजमची सगळीच लक्षणे  एकाच मुलामध्ये  दिसणार नाहीत.   पण निदान करताना गरजेचे आहे की काही लक्षणं त्या मुलामध्ये एकत्रितरीत्या असली पाहिजे. आपले बालरोगतज्ञ/ developmental pediatrician पालकांकडून मिळालेली माहिती आणि मुलांच्या वागणुकीतली निरीक्षणे यातूनच निदान निश्चिती करू शकतात ;ज्याला DSM 5 criteria असे म्हटले जाते.

उपचार

आपल्याला जरी ऑटिझमची कारणे माहीत नसली तरी जलद निदान आणि उपचार ही मुलांच्या चांगल्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे हे मात्र निश्चित आहे   .  Developmental आणि Behavioral म्हणजे  विकासात्मक आणि वर्तनात्मक पद्धतींचा वापर जर लवकरात लवकर मिळणाऱ्या उपचार सेवेमध्ये समाविष्ट केला तर सामाजिक संभाषण संवाद कौशल्य यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. त्यासाठी अर्ली  इन्तेर्व्हेनशन सेवा मुलांच्या उपचारासाठी मुलभूत ठरते. या  सेवेमध्ये  विशेष   प्रकारचे शिक्षण, कम्युनिकेशन थेरपी म्हणजेच संवाद वाढवण्याची उपचार पद्धती,सेन्सरी इंटीग्रेशन म्हणजे  संवेदनात्मक जाणिवांचे विकसन यांचा समावेश होतो. 

अश्या थेरपीमुळे ऑटीझम झालेली मुलं ही स्वतंत्ररीत्या आणि जास्त चांगल्या तर्‍हेने आयुष्य जगू शकतात. फारच अवघड वर्तन दिसत असेल तर केवळ काही स्थितींमध्येच या समस्येवर औषधोपचारांची आवश्‍यकता पडू शकते 

ऑटिझमची (स्वमग्नता) लक्षणे काय आहेत?

ऑटिझम निदान वय आणि सुरुवातीची लक्षणे बरीच वेगवेगळी असतात. लक्षणांच्या वैविध्यामुळेच त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असेही म्हणतात.  काही मुलांत त्यांच्या पहिल्या महिन्यांत तर काहींमध्ये  2 किंवा 3 वर्ष वयापर्यंत लक्षणे स्पष्ट  होतात. 

ऑटिझम असलेल्या सर्व मुलांमध्ये सर्व लक्षणे दिसतच असे नाही. नाहीत. ऑटिझम नसलेली अनेक मुले काही लक्षणे दर्शवतात. म्हणूनच आपल्या बालरोगतज्ञचा सल्ला महत्वाचा ठरतो.  

तुमच्या मुलाला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा धोका आहे का त खालील गोष्टीवरून लक्षात येऊ शकते. जर तुमच्या मुलामध्ये खालीलपैकी काहीही दिसून आले तर, तुमच्या बालरोगतज्ञचा सल्ला घ्या. 

6 महिन्यांपर्यंत

 1. बघून क्वचित किंवा अजिबात न हसणे, नजरन लावणे. हसरे, आनंददायक आणि खेळकर हावभाव फारसे न दाखवणे 
 2. क्वचित किंवा अजिबात नजर न लावणे 

9 महिन्यांपर्यंत

 1. आवाज, हसू किंवा चेहऱ्यावरील इतर भावांचे   ( expressions) खूप  थोडेसे किंवा अजिबात प्रतिसाद देऊन त्यांचे आदानप्रदान न करणे 

12 महिन्यांपर्यंत

 1. क्वचित किंवा अजिबात बडबड न करणे
 2. बोटाने एखादी आवडीची गोष्ट दाखवणे , पुढे होऊन वस्तुपर्यंत पोहचणे किंवा टा टा करणे ह्या सारख्या हावभावांचे आदानप्रदान करता न येणे.  
 3. नावाने कुणी हाक दिल्यास फारसा किंवा अजिबात  प्रतिसाद न देणे

16 महिन्यांपर्यंत

फार कमी किंवा अजिबात शब्दांचा वापर न करणे 

24 महिन्यांपर्यंत

दोन-शब्दाच्या अर्थपूर्ण वाक्यात क्वचित किंवा अजिबात बोलता न बोलणे (अनुकरण करणे किंवा पुनरावृत्ती करणे या व्यतिरिक्त) 

कोणत्याही वयात

 1. पूर्वी शिकलेले शब्द , बडबडीचे आवाज किंवा सामाजिक कौशल्ये विसरणे
 2. नजर देणे टाळणे
 3. सतत एकटे रहाणे 
 4. इतर लोकांच्या भावना समजून घेण्यात अडचण येणे.
 5. भाषाविकासाला विलंब लागणे
 6. शब्द किंवा वाक्यांची सतत पुनरावृत्ती (इकोलेलिया) करणे. 
 7. दिनचर्या किंवा सभोवतालच्या परिस्थितीत/ गोष्टीत किरकोळ बदलांना प्रतिकार दर्शविणे.
 8. वर्तन आवडी-निवडी आणि कृतीमधील मर्यादित ठराविक पणा आणि पुनरावृत्ती

(उदा. स्वतःभोवतीच गोल गोल फिरणे, हात हलवत रहाणे , चेहऱ्याजवळ  बोटांची आणि हातांच्या विक्षिप्त हालचाली करत रहाणे इ.)

 1. काही ठराविक प्रकारचे अन्न किंवा काही ठराविक पोत असलेले कपडे न आवडणे.

आवाजा विषयी अतिसंवेदनशील असणे, रंग किंवा लाईट्सचे असामान्य आकर्षण आणि आवडीनिवडी असणे 


गैरसमज / तथ्य 

1)गैरसमज: लसीकरणामुळे ऑटिझम होतो

तथ्य  शास्त्रीय संशोधनात हा गैरसमज खोडून काढलेला आहे. ऑटिझम हा न्युरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. गर्भावस्थेपासून या बाळांच्या मेंदूच्या पेशींची जोडणी ही वेगळ्या प्रकारची असल्याने मेंदूची वेगळी कार्यप्रणाली दिसून येते.   लसीकरण किंवा इतर कुठल्याही बाह्य कारणांनी ऑटिझम होत नाही

2) गैरसमज:  मुलांच्या संगोपनातील चुकांमुळे किंवा मुलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांमध्ये ऑटिझम होतो. तसेच गर्भावस्थेत मातेने योग्य काळजी न घेतल्यामुळे मुलांमध्ये ऑटिझम होतो.

तथ्य : प्रत्येक कुटुंब/ पालक आपल्या मुलांसाठी आपल्या परीने झटत असतात त्यामुळे स्वतःला किवां इतरांना दोष देऊ  नये.  पालकांच्या कोणत्याही बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे मुलांना ऑटिझम होत नाही.   ऑटिझम मुलांच्या मेंदूत अगदी सुरुवातीपासून पेशींची वेगळ्या स्वरूपाची जोडणी आढळते.

3) गैरसमज: ऑटीझम असलेली मुलं अंतर्मुखी एकलकोंडी असतात आणि मित्रांमध्ये रमत नाही

तथ्य :  ऑटीझम मुलांना संवाद सुरू करणे व तो पुढे नेणे यात अडचण असते. परंतु ते मैत्री जपण्यात पूर्णपणे सक्षम असतात. थोडा मदतीचा हात आणि उपचारांची साथ ह्या मुलांना त्यांच्या भाषा व संवादाच्या अडचणींवर मात करण्यास आश्वासक ठरू शकते. इतर मुलांप्रमाणे त्यांना मित्रांसोबत राहण्यास आवडते. 

4) गैरसमज: ऑटीझम मुलं कधीच स्वावलंबी आयुष्य जगू शकत नाहीत.

तथ्य :  वागण्यातील व आरोग्याच्या समस्यांमुळे ही मुलं कधीच स्वावलंबी बनू शकत नाही असं बरेचदा गृहीत धरलं जातं. वेळेवर निदान व जलद उपचार याने ही मुलं आपल्या समाजात सक्रिय सहभाग नोंदवू शकतात. किंबहुना अश्या प्रकारच्या गैरसमजुतीच ह्या मुलांच्या आयुष्यात अधिक मोठे अडसर उभे करतात.  

5) ) गैरसमज:  ऑटिझम पूर्णपणे बरा होतो. 

तथ्य :  ऑटिझम  हि जन्मभर राहणारी वैकासिक समस्या आहे. कुठल्याही औषधाने तो बरा होत नाही. ऑटिझम उपचार करण्याच्या कुठल्याही दाव्यां संबंधी पालकांनी 

सदैव सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे ऑटिझम मुलांमध्येसुद्धा काळाप्रमाणे बदल घडत असतात. बरीचशी ऑटिझम मुलं थोडा आधार आणि मदतीने शैक्षणिक प्रगतीचा मोठा पल्ला गाठतात आणि एक चांगले आयुष्य जगू शकतात. 

६) गैरसमज: ऑटिझम असलेली सर्व मुलं जिनियस/ कुशाग्र असतात

तथ्य : ऑटिझम मुलांच्या बौद्धिक क्षमता ह्या इतर मुलांप्रमाणेच असतात.काही ऑटिझम मुलांमध्ये विशेष गुण किंवा कौशल्य आढळतात. मात्र हा सरसकट नियम ठरत नाही. ऑटिझम मुलांमध्ये इतर मुलांप्रमाणेच गुण/कौशल्य यात विविधता दिसून येते. 

७) गैरसमज:  ऑटिझम मुलं नजरेला नजर लावू शकत नाहीत

तथ्य : जरी ह्या मुलांना नजर लावण्यात अडचणी असल्या तरी ते हि क्षमता नेहमीसाठी गमावून बसत नाहीत . नजर न लावणाऱ्या मुलांमध्ये ऑटीजम लवकर लक्षात येण्याची शक्यता असते. ह्या मुलांना नजर लावण्याचा आग्रह  धरु नका. त्यांना  जेव्ह्या बोलणाऱ्यांशी आरामदायक आणि आत्मविश्वास जाणवेल तेव्हा ते उत्फूर्तपणे नजर लावू शकतात.     

८) गैरसमज:  ऑटिझम ठरावीक समाज स्तरातील मुलांमध्येच आढळतो

तथ्य :   व्यापक शास्त्रीय संशोधनातून आढळले आहे की कुठल्याही प्रदेशातल्या, सामाजिक किंवा आर्थिक स्तरातल्या मुलांना ऑटीझम होऊ शकतो.

९) गैरसमज:  ऑटिझम हा संसर्गजन्य आजार आहे

तथ्य:   ऑटिझम हा वैकासिक समस्या आहे . यात मेंदूतील पेशीतील वेगळ्या जोडणीमुळे त्यांच्या मेंदूत वेगळी कार्यप्रणली दिसून येते.  त्यामुळे मेंदूची शारीरिक क्रियांचे व्यवस्थापन ठेवण्याची क्षमता कमी होते.  शारीरिक संपर्कामुळे  ऑटिझम पसरत नाही. 

१०) गैरसमज:    ऑटिझम असलेल्या मुलांना त्यांच्या सामाजिक संवादातील अडचणीमुळे भावना नसतात

तथ्य:   संवेदानाचे व्यवस्थापन आणि सामाजिक  संवादातील वेगळेपण यामुळे त्यांचा भावनाविष्कार हा इतरांपेक्षा वेगळा असू शकतो.   भावनाविष्काराचे हे वेगळेपण समजून घेऊन त्याचा स्वीकार करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.  

११) गैरसमज:   ऑटिझम मुलं संवाद साधू शकत नाही

तथ्य:    संवाद   साधण्यात बोलण्या पलीकडे बरच काही असतं.   फक्त शब्दातून संवाद साधता येतो असे नाही. काही ऑटिझम मुलं थेरपी नंतर बोलायला लागतात. इतरांना मात्र थोड्या मदतीची गरज   भासते ; ज्यात हातवारे आणि इशाऱ्यासोबत संभाषणाच्या  पर्यायी माध्यमांचा (उदाहरणार्थ उपकरणांचा) वापर करून संवाद साधणे शक्य होते.  

१२) गैरसमज:   ऑटिझमच्या निदानासाठी मेंदूचास्कॅन , ईईजी ( मेंदूच्या पट्टीची)  आवश्यकता असते

तथ्य:    मुलांच्या वर्तवणूकीचे काळजीपूर्वक विश्लेषण आणि पालकांसोबतच्या  मुलाखतीनंतर  डॉक्टर   ऑटिझमचे निदान निश्चित  करतात. कुठलीही वैद्यकीय चाचणी  ठामपणे ऑटीजमचे निदान करत नाही.मात्र डॉक्टरांना जर मुलांमध्ये झटके/ आकडीची शक्यता किंवा इतर जोड समस्यांची शंका असल्यास त्याच्या   निदानासाठी  डॉक्टर मेंदूचास्कॅन ,   ईईजी ( मेंदूच्या पट्टीची)  किंवा इतर चाचण्या सुचवू शकतील. 

१३) गैरसमज:   ऑटिझम मुलांना कोणीही स्पर्श केलेला आवडत नाही

तथ्य:    ऑटीझम असलेली काही मुलं  स्पर्शाप्रती   संवेदनशील असू शकतात  आणि त्यामुळे ती कुठल्याही  स्पर्शाने  अस्वस्थ होऊ शकतात. परंतु    ऑटिझम व्यक्तींना  जवळ घेणे कवटाळणे हलकी मसाज करणे किंवा इतर कुठल्याही स्वरूपाचा सुरक्षित स्पर्श इतर मुलांप्रमाणे आवडतात 

१४) गैरसमज:   ऑटिझम असलेल्या व्यक्ती ह्या स्वभावाने आक्रमक असतात आणि  त्यांच्यात सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तणूक  आढळते

तथ्य:  चिंता आणि चिडचिड वाढवणाऱ्या  परिस्थिती हाताळण्यात ह्या मुलांना अडचणी जाणवतात. योग्य उपचारांच्या मदतीने त्यांना परिस्थिती कशी हाताळावी  हे शिकवल्यास त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अश्या प्रसंगावर कशी  नियंत्रित प्रतिक्रिया द्यावी हे कळते. परंतु आक्रमकता हा ऑटीझमचा अंगीभूत भाग नाही

१५) गैरसमज:   ऑटिझम हा काही विशिष्ट आहार घेतल्याने बरा होतो. 

तथ्य:    अन्नातील काही घटकांप्रति  अलर्जी असलेल्या व्यक्तिंना काही विशिष्ट आहाराचा फायदा होऊ शकतो.  आहारातील या अलर्जीजन्य घटकांमुळे होणारा त्रास अशा विशिष्ट आहारांमुळे कमी होतो.  अश्या बदललेल्या आहाराने मुलाचे सर्वसाधारण आरोग्य सुधारण्यास मदत होते.  परंतु अशी  तब्येतीत सुधारणा बऱ्याचदा  ऑटिझमवरील पूर्ण उपाय असा गैरसमज होऊ शकतो. 

Tags:  Paediatrics and Child Care,Autism, Autism Awareness, Autism Special

Note: We at Medikoe provide you with the best healthcare articles written and endorsed by experts of the healthcare industry to boost you knowledge. However, we strongly recommend that users consult a doctor or concerned service provider for expert diagnosis before acting on this information.

  0 Likes |    0 Comments |    0 Share |    700 Views
COMMENTS